फोल्डर

गच्च भरलेल मेंदू नावाच कम्प्युटर
त्यात असती किती किती फोल्डर
काही कामाचे काही बिनकामाचे
अगदीच खाजगी म्हणून जपलेले
आणि नजरेतून उगाच सुटलेले
आयत्या वेळी कामी यावे म्हणून
अगदी गुप्त ठेवलेले
आणि कामाच्या वेळी कधीच
न सापडलेले
सोयिसाठी उघडून ठेवलेले
आणि सोयीसाठीच बंद असलेले
काही कडी कुलुपातले
काही मुक्त संचारणारे
आठवणींचा खजिना असलेली
खजिन्याची आठवण देणारे काही
हळूहळू भरत जातंय एक एक फोल्डर
वाटत कधीतरी चालावावं
डिलिट नावाचं बुलडोझर
पण मग लगेच मन भानावर येतं
सुक्यासोबत कधीतरी ओलं पण जळतं
असं करता कामा नये !!
सुक्याची होईल राख आणि
ओल्याचा धूर होईल घरभर
म्हणूनच जपून ठेवलंय
मेंदूच्या कोपऱ्यातील
एक न एक फोल्डर !!

ओळख !!

हरवून माझे मीच मला
सापडते मग काय मला ?

कवितेतल्या ओळी काही
चांदण्यातले भिजणे काही
ओठावरच्या पाकळ्यांचे
अलगद गाणे आठवणीचें

पुस्तकातील खूण एक
मोरपीसाचे ठसे अनेक
सुकलेल्या फुलातूनही
गंध येतो अजून काही

पायामधले एकच पैंजण
गोड क्षणांची गोड साठवण
मोहक सुंदर जशी काजळी
शांत रात्र ती डोहाजवळी

कल्पनेतले भास माझे
जसे कधी न ओळखीचे
तरीही वाटे असे असावे
माझेच नव्याने रूप दिसावे

ओळख माझी पूर्ण करावी
पुन्हा पुन्हा मी मला मिळावी
असे हरवता मीच मला
सापडते मग मीच मला !!

देऊळ ( पिंपळपान:५)

न ओवाळीले कोणी ,न काढली फुलांची रास
न दिवे लावले चमचमीत न दरवळे धुपाचा वास

न नवस बोलतो कोणी जाउनी तिथे अनवाणी
न थाल पंच पक्वानाची नसे तिर्थापुरता पाणी

त्या पडक्या मंदिरातील देवही उपाशी निजतो
जाता येता रहिवाशी तो दुरूनच नित्य बघतो

शमवण्या क्षणिक दुःख बांधले कुणी देऊळ
फिरकत नाही त्याचेही त्या पायरीवर पाऊल

ठेवून गेला मजसी मी त्यासही अवगत नाही
जो शोधतो सर्वत्र पण मनात हुडकत  नाही

जरी असे भवताली  ओसाड, रुक्ष, माळरान
कधीतरी गाभाऱ्यातून फुलवेन पिंपळपान !!

( भरधाव रस्त्यावर जेव्हा कुणीतरी आपल्या सोयीसाठी छोटे छोटे देऊळ उभारतात )

कण

शब्दामध्ये शोधत असतो अर्थापुरती भाषा
वाळूवरती मारत असतो उभ्या आडव्या रेषा
पुसेल का ते कधी कुणी ह्याची चिंता असते
सुकलेल्या वाळूवरी जेव्हा ओली माया दिसते
निसटून जाईल हातातून ठाऊक नसते केव्हा
लहर येऊनि घेऊन जाते जाणवते मग तेव्हा
तरी उराशी सदैव असते शिंप्यामधले मोती
शब्द अपुरे पडले जरिही अर्थ  ठेवुनी जाती
चिंब होऊनि परतून येति ओलेत्याचे क्षण
अंगावरती निमूट बसती  वाळूमधले कण !!

अब मैं कुछ कहना नही चाहता ( सर्वेश्वर दयाल सक्सेना )

अब मैं कुछ कहना नहीं चाहता,
सुनना चाहता हूँ
एक समर्थ सच्ची आवाज़
यदि कहीं हो।
अन्यथा इसके पूर्व कि
मेरा हर कथन
हर मंथन
हर अभिव्यक्ति
शून्य से टकराकर फिर वापस लौट आए,
उस अनंत मौन में समा जाना चाहता हूँ
जो मृत्यु है।
‘वह बिना कहे मर गया’
यह अधिक गौरवशाली है
यह कहे जाने से—
‘कि वह मरने के पहले
कुछ कह रहा था
जिसे किसी ने सुना नहीं।’

….जगणे आहे

श्वासांमधला अर्थ शोधण्या जगणे आहे
कुणकुणाचे दुःख सोसण्या जगणे आहे

कुठे जरी मग असे उधारी एका दमडीची
हजार सुखे उधार ठेवून जगणे आहे

कसली तत्वे अन त्याग रिक्त असती जेव्हा हात
मुठीत पिवळून स्वाभिमान हा जगणे आहे

उभा राहे मंदिरातल्या दारापाशी एक भिकारी
खळगी भरण्या देव शोधणे जगणे आहे

अश्रूंवरही दडपण असते डोळ्यामागे लपण्याचे
लपवून सारे दुःख जगाचे हसणे म्हणजे जगणे आहे

तुम्हारे साथ रहकर ( सर्वेश्वर दयाल सक्सेना )

तुम्हारे साथ रहकर
अक्सर मुझे ऐसा महसूस हुआ है
कि दिशाएँ पास आ गयी हैं,
हर रास्ता छोटा हो गया है,
दुनिया सिमटकर
एक आँगन-सी बन गयी है
जो खचाखच भरा है,
कहीं भी एकान्त नहीं
न बाहर, न भीतर।

हर चीज़ का आकार घट गया है,
पेड़ इतने छोटे हो गये हैं
कि मैं उनके शीश पर हाथ रख
आशीष दे सकता हूँ,
आकाश छाती से टकराता है,
मैं जब चाहूँ बादलों में मुँह छिपा सकता हूँ।

तुम्हारे साथ रहकर
अक्सर मुझे महसूस हुआ है
कि हर बात का एक मतलब होता है,
यहाँ तक कि घास के हिलने का भी,
हवा का खिड़की से आने का,
और धूप का दीवार पर
चढ़कर चले जाने का।

तुम्हारे साथ रहकर
अक्सर मुझे लगा है
कि हम असमर्थताओं से नहीं
सम्भावनाओं से घिरे हैं,
हर दिवार में द्वार बन सकता है
और हर द्वार से पूरा का पूरा
पहाड़ गुज़र सकता है।

शक्ति अगर सीमित है
तो हर चीज़ अशक्त भी है,
भुजाएँ अगर छोटी हैं,
तो सागर भी सिमटा हुआ है,
सामर्थ्य केवल इच्छा का दूसरा नाम है,
जीवन और मृत्यु के बीच जो भूमि है
वह नियति की नहीं मेरी है।

रंग काळा पांढरा

अवती भवती सुगंध सारा
खुले निषेतून श्वेत मोगरा
रातराणीला बहरून येण्या
मिळे रातिचा गर्द गाभारा

चराचराला रंगीत करती
निसर्ग होतो रम्य पसारा
काळ्या मेघातुनी जेव्हा
बरसत येति शुभ्र धारा

रंगीत सृष्टी बघण्यासाठी
दो नयनांचा संग जसा हा
आयुष्याच्या माध्यान्हातील
अनुभवाचा रंग जसा हा

दोन्ही विरुद्ध जरी दिसती
साथ सदैव तरी असती
सप्तपदीच्या पाऊलातले
दोन पाऊले चालत येति

आयुष्याचे खेळ असे हे
रात-दिनाचे मेळ दिसे हे 
रंगहीन जरी म्हणती सारे
चांदण्याचे आभाळ दिसे हे

Inspired by a friend’s art

उर्मिला

ह्या विरहवेदनेची असे कुणाला जाण ?
दर्शनाविन होईल का मी गतप्राण ?

मम भगिनीचे कष्ट दिसे जगाला
कोण विचारी दुःखीत ह्या मनाला

मज आवडेना फुल फुलांच्या बागा
नको साज अन उंची वस्त्रांचा त्रागा

भेटीची आस लावते ह्या नयनात
होते का असेच दुःख तव हृदयात?

सोडूनि पाश सारे  यावे मीलनाला
कर्तव्याची मग जाण होते मनाला

कसली राणी मी तर तव दासी
मी भोगविलासातली सन्यासी

सभेत एकटी अशी मूक बाला
लक्ष्मणाची भार्या ती मी उर्मिला !!

पिंपळपान : ४

अनोळखि ह्या संध्याकाळी
ओळखिच्या त्या आठवणी
कुणा न कळले कसे सरले
दिस आले दिस गेले
कुणा न कळले
उभा दिवस हा बसू लागला
आधार जरासा शोधू लागला
ऊन कोवळे गडद जाहले
रान हळूहळू पिवळे झाले
कुणा न कळले
मातीचाही सुगंध गेला
वाऱ्याचाही धुंद गेला
रंग फुलांचे मिटले सारे
इथे न आता फुलपाखरे
कुणा न कळले
का तरीही ?
खुलु लागती भाव स्पंदने
जन्मभराच्या ओलाव्यातून
सुटू लागाति पिंपळपाने!!

Design a site like this with WordPress.com
Get started