आज मी आयुष्य माझे ..( संदीप खरे )

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो…

त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
अन नको म्हटले तरी मी जगाया लागलो.

गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो…

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो…

शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो…

मज न आता थोडकी आशा कुणी की वाह म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो…

काय हे आयुष्य माझे, काय ही थट्टा तरी
मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो…

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया लागलो…

The Ballad of the Sun and the earth ( Amish from the book Ravan )

The Clouds rush to the mountains , they caress him gently

They fight for his attention , they rise to kiss his lips

The Clouds believe the mountain is smitten ,

that he stands so hight to not let them pass

that he stands uncomfortably still with Rishi like repose

because he waits for their return every year

There is no doubt in their mind , the Mountain loves them

It is sad that they’ll never know

that the mountain does not care for them

It only wants the nourishing rain they carry

He doesn’t nudge them up to kiss them

He does it to break them and get what he wants

And by the time they understand , it’s too late

It’s sad that no cloud survives to warn the others

————————————————————————

The River Rushes to the Sea

Her instincts tell her this is her destiny

She’s grown up on stories of love

And on tales of blind and illogical passions

And she’s in too much of a hurry to meet her lover

To feel rather than think

But when she sees the Sea

His immensity , depth and power .

She hesitates and meanders

But her innate romanticsm wins

And she flows happily into his arms

It’s sad that she will never know

that the sea doesn’t love her

That the sea is too lost in his own grandiosity

to even notice the river

That her loving embrace doesn’t change the Sea

That the water she received as a gift from the sea

Was actually given to her by a philantrophic Sun

It’s sad by the time the River realises the truth ,

She’s already lost her her identity

———————————————————————————

And then there is the Earth

Unlike the other , she thinks more than feel

Her mind is more powerful than her heart

She sees the Sun

Alone , luminous and magnificent

Has so much and is so wasteful with it

The Earth being smart

Uses the Sun’s wasted energy

Nourishes herself and grows

In character, mind body and spirit

She marvels at her own brilliance

and what she’s done with Life

She fears the Sun and his immense powers

And hates the way he lavishes his God given gifts

It’s sad that she’ll never know that the Sun could have left

Yet he stands there all alone so that he can give to the Earth

He wants to come closer but he knows he can’t

He knows his passion is so strong that it will hurt her

So he stands afar and admires his Lady

It’s sad that no one’s around to tell the Earth

Just how much the Sun loves her .

चारोळ्यातून आरोळ्या

राहूदे तशीच ओल्या पाकळ्यांची आसवे
श्वास आहे रोखलेले हेचि ह्यातून भासते

ज्ञात नसते ज्यास काही हे बुरे की चांगले
देव नाही तोचि कोणी हेचि ह्यातून भासते

खोल खोली काळजाची बंद काही कवडसे
खूप दिसले पावसाळे हेचि ह्यातून भासते

थांबली कंठावरी अबोल काही वर्तने
भान आहे चाचपूनि हेचि ह्यातून भासते

आवळूनि बांधले पंखास ह्या दोन्हीकडे
खोल रुजली पाळंमुळं हेचि ह्यातून भासते

तू मला अन मी तुला फार ना संबोधले
शब्द छोटे भाव मोठे हेचि ह्यातून भासते

वामांगी (अरुण कोलटकर )

देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच

पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण

कुछ कहना है ….

एक कविता मैं सालो से लिख रही हु
कभी एक शब्द , कभी एक लाइन
कभी बस खयाल ,कभी दिल का हाल
सुबह की सुनहरी धूप में शुरू होती है
शाम आते ही थक जाती है
रोज रात को सिरहाने ले के सोती हु
और मेरे सारे सपनो का वास्ता देती हूं
किसी एक सपने से प्रेरित होकर
खत्म हो जाये ये हारकर
पर ये फिर सुबह उठती है
नई सी लगने लगती है
एक कविता खत्म होने से डरती है
मगर कविता कुछ कहना चाहती है !!

मृगजळ

आयुष्याची गाडी मागे वळवून नेता येत नाही
आठवणींच्या रस्त्यावर पळवाट दिसत नाही

सोसाट सुटाव असा वारा हरवला कुठेतरी
पेल्यातल्या वादळाला जपतोय जिवापरी

आशेचे मोर बागेत सुदंर पिसारा खुलवतात
घरभर फिरून पावलं उंबरठ्यावर थांबतात

हवंहवंसं वाटणार सारच काही मिळत नसत
त्याच्याकडे धावतो हे मृगजळालाहि कळत नसत

द्वंद्व

जाता गुजगोष्टींच्या माहेरी
उभे कुणीतरी  दारावरी
ऐकायला तेच गाऱ्हाणे
काही नवे काही पुराणे
ओळख आहे फार जुनी
ओळखले न त्यास कुणी
सोडून जाता सखे सोबती
तो एकच हात होता हाती
चेहरा मोहरा माझा जसा
समोर असे एक आरसा
माझेच रूप द्वंद्वातले
माझ्यपुढे उभे राहिले !!!

…….

जसे बदलती ऋतू , काळ अन दिवस
आपणही बदलतो का ?
शरीर जसे बदलते  दिवसागणिक
मन पण तसेच होते का ?
कधी आवडत होता मोराचा पिसारा
आज फक्त निसर्गाचा नियम दिसतो का ?
लहानग्या भातुलिकचा खेळ खेळला कधी
मोठया मोठ्या संसाराला तसेच खेळतो का ?
पावसाच्या पाण्याने भरलेले खळगे दिसायचे जसे
मनाची खळगी तशीच दिसते का ?
सहज चालणाऱ्या आयुष्याला आपण
सहज म्हणून बघतो का ?
खरंतर तसच करायला हवं
नदीला प्रवाह आहे ,वाऱ्याला दिशा आहे
ढगाला पाऊस आहे
श्वास आहे तोवर आयुष्य आहे
एकाच आयुष्यात आपण एकच म्हणून जगतो का ?

सोनचाफा!

काल अचानक हातात सोनचाफा आला
मी त्याला अलगद हातात घेतलं
त्याचा सुगंध अनुभवला
आणि मनातल्या मनात खूप सुखावले
सुंदर क्षण होता तो
दुर्मिळ असतो ना सोनचाफा ?
पण मी त्याला टिपू शकले नाही
त्याला रेखाटल पण नाही
आणि कुणाला वर्णन पण नाही केलं
त्याला सूर्याचं प्रतिक, दिव्याची ज्योत
वगैरे संबोधलं नाही
त्याला ‘सोनचाफाच’ म्हणत राहिले
तेच खरं आहे , आणि तेच अपेक्षित आहे
कारण तेव्हा मी मी होती आणि तो सोनचाफा होता !!

तोता

ये जीवन के क्षण कण कण में समाप्त होते है
इन्ही क्षणों में कुछ ऐसे भी होंगे
जो धरती की गोलाकार को
ध्यान में रखकर सामने आएंगे
बड़ी सी ये दुनिया अचानक लगे छोटी है
उस वक्त
वाणी शायद समाज को जानकर
अपने आप को सतर्क रखती है
पर मन में जागी चेतना जब
आंखों में लालटेन जलाति है
तब वो किसी समाज को नही जानति
ऐसे क्षण जब आते है
तब मैं अपने पैर के नाखून की
लंबाई देखती हूं ,
और दुनिया को दिखाती हु
किसी चित्र पर बना वो तोता
जो पिंजरे में बंद तो नही है
पर उड़ कर भागता भी नही !!

Design a site like this with WordPress.com
Get started