जसे बदलती ऋतू , काळ अन दिवस
आपणही बदलतो का ?
शरीर जसे बदलते दिवसागणिक
मन पण तसेच होते का ?
कधी आवडत होता मोराचा पिसारा
आज फक्त निसर्गाचा नियम दिसतो का ?
लहानग्या भातुलिकचा खेळ खेळला कधी
मोठया मोठ्या संसाराला तसेच खेळतो का ?
पावसाच्या पाण्याने भरलेले खळगे दिसायचे जसे
मनाची खळगी तशीच दिसते का ?
सहज चालणाऱ्या आयुष्याला आपण
सहज म्हणून बघतो का ?
खरंतर तसच करायला हवं
नदीला प्रवाह आहे ,वाऱ्याला दिशा आहे
ढगाला पाऊस आहे
श्वास आहे तोवर आयुष्य आहे
एकाच आयुष्यात आपण एकच म्हणून जगतो का ?