ती सावली कुणाची?
हळुवार पावलांनी जरी देऊन स्पर्श ओला
झुळुक वाऱ्याची परी पेटवी अनेक ज्वाला
मान वळविता मागे अदृश्य जाहले सारे
मग कोवळ्या सुखाची,ती सावली कुणाची?
वाटे उरात चाले जसा आक्रंद भावनांचा
का भासतो असा हा आनंद विकृतीचा
सोडूनि पाश सारे मन बेभान धावणारे
पाऊलखुणा विचारी,ती सावली कुणाची?
ओघ वाढे जिवाला,करी दाह आक्रोश
चहुकडे गर्द काळोख तो एकटा प्रकाश
नयनांना आस येता मी दर्शनास जावे
दृष्टीत येत नाहि,ती सावली कुणाची ?
रोकला श्वास कैसा ठाऊक मला ना माझे
वाटेवर उतरणिच्या अव्यक्त कामना ओझे
भेटता नयन दोघा मज कोण ओळखावे
तरि लागली जिव्हारि, हि सावली कुणाची?