धुगधुगी

दोन झऱ्यांच्या अंतरातली
सुप्त अग्नी गुप्त गुहेतली
का कळेना का ती जळते
पेटते ती! का तिला कळते ?
ऊन वारा थंडी पाऊस गारा
कुणी न तिला शमवणारा
विझता विझता पुन्हा उठते
कुणा न परी अता चेतवते
आंच तिची नको कुणाला
कोण जाईल ऐशा गुहेला
तरी ठिणग्यांची आस ठेवते
धुगधुगी ती राखून धरते !!

एकदाच ओंजळीत .. ( संदीप खरे )

एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई

अगदीच हळूवार नको राजरोष
पाकळी एक नको डवरली घोस
पानासाठी कवितेच्या देना खुण काही
एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई

क्षण एक थांब अशी हवीशी होऊन
एकदाच मनी तुला घेतो चितारून
आणि तुझ्या मौनाचीच चित्रावर सही
एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई

एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई एकदाच ओंजळीत देना जाई-जुई

मौनाचे भत्ते

मी शब्दांच्या भानगडीत पडले नसते ,
फक्त मौनाने कोडे सोडवले असते
तर आज कदाचित सुखी असते

पण मौनाच्या अंधाऱ्या वाटेत
शब्दांचे दिवे घेऊन काखेत
फिरत असते प्रश्नांच्या समवेत

ते गाठतात मला अनवाणी
कधी झोपेत कधी जागेपणी
माझ्याच भावनांची गवसणी

उत्तर तरीही सापडत नाहीत
कोडे तरीही सुटत नाहीत
वाटा तरीही सापडत नाहीत

सापडतात ती फक्त शब्द
मी एकाकी आणि स्तब्ध
भोगताना माझेच प्रारब्ध

पण तरीही मी वाहते
डोक्यावर शब्दांचे पोते
मौन भरतय त्याचे भत्ते

खरच मी हे सोडले असते
शब्दांच्या भानगडीत पडले नसते
पण कदाचित मी , मी नसते !!

“साठीचा गजल” कविवर्य विंदा करंदीकर

हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो– खोटे कशास बोला–
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी !

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

प्रत्यक्ष भेटली का ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी !

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी !

“साठीचा गजल” कविवर्य विंदा करंदीकर

अजून उजाडत नाही ग ( संदीप खरे )

अजुन उजाडत नाही ग, नाही ग
दशकांमागून सरली दशके
अन् शतकांच्या गाथा ग
ना वाटांचा मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग

पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी
पान जळातून वाही ग

अजुन उजाडत नाही ग, नाही ग

कधी वाटते
कधी वाटते दिवस-रात्र हे नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग

स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसुर शांतता, कानी कूजन नाही ग
अजुन उजाडत नाही ग, अजुन उजाडत नाही ग

एकच पळभर, एखादी कळ
अशी सनाणुन जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग
ती कळ सरते, हूरहुर उरते, अन् पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतून उमलत नाही ग

अजुन उजाडत नाही ग, नाही ग
अजुन उजाडत नाही ग

एक मुलाकात ( अमृता प्रीतम )

मैं चुप शान्त और अडोल खड़ी थी
सिर्फ पास बहते समुन्द्र में तूफान था……फिर समुन्द्र को खुदा जाने
क्या ख्याल आया
उसने तूफान की एक पोटली सी बांधी
मेरे हाथों में थमाई
और हंस कर कुछ दूर हो गया

हैरान थी….
पर उसका चमत्कार ले लिया
पता था कि इस प्रकार की घटना
कभी सदियों में होती है…..

लाखों ख्याल आये
माथे में झिलमिलाये

पर खड़ी रह गयी कि उसको उठा कर
अब अपने शहर में कैसे जाऊंगी?

मेरे शहर की हर गली संकरी
मेरे शहर की हर छत नीची
मेरे शहर की हर दीवार चुगली

सोचा कि अगर तू कहीं मिले
तो समुन्द्र की तरह
इसे छाती पर रख कर
हम दो किनारों की तरह हंस सकते थे

और नीची छतों
और संकरी गलियों
के शहर में बस सकते थे….

पर सारी दोपहर तुझे ढूंढते बीती
और अपनी आग का मैंने
आप ही घूंट पिया

मैं अकेला किनारा
किनारे को गिरा दिया
और जब दिन ढलने को था
समुन्द्र का तूफान
समुन्द्र को लौटा दिया….

अब रात घिरने लगी तो तूं मिला है
तूं भी उदास, चुप, शान्त और अडोल
मैं भी उदास, चुप, शान्त और अडोल
सिर्फ- दूर बहते समुन्द्र में तूफान है…..

स्त्री – पुरुष

स्त्री आणि पुरुष

माझ्याच आत आहेत दोन्ही , माझ्या स्रीत्वात एक पुरुष पण ठेवला आहे मी. वेळप्रसंगी एक मित्र म्हणून बोलायला ,मला सहानभूती द्यायला किंवा माझी हिम्मत वाढवायला .माझ्यावर निष्पाप प्रेम करणारा , निस्वार्थ पणे माझा हात हातात घेऊन मला समजावणारा .
मनातील हितगुज ऐकून त्यावर टीका टिप्पणी करणारा एक मित्र मी माझ्या आत ठेवलाय , मी माझी समर्थ आहे. असंख्य नाव असलेली नाती असूनही शेवटी नावसाठीच उरतात, त्यापेक्षा कुठलंही नाव नसलेलं एक नात मी माझ्यात जपून ठेवलंय .
कारण , ह्या स्त्री नावाच्या शरीराबाहेर समाजाच्या भेकड आणि संकुचित अश्या पुरुषवर्गाला मी नाकारलं आहे !!

जोगीण २ ( कुसुमाग्रज )

कुसुमाग्रजांची ही कविता आता काही दिवसांपूर्वी ऐकली आणि वाटलं , अजून किती आणि काय आहे जे वाचायच आहे ,ह्या एका आयुष्यात त्याची पुर्ती होईल असं वाटत नाही , त्यासाठी एक जन्म अजून घ्यावा लागणार . ह्या कवितेमध्ये नास्तिक आणि आस्तिक अश्या दोन बाजू मांडल्या आहेत पण सरलर्थी ती कविता जशी दिसते तशी ती नक्कीच नसावी तर त्यापलीकडे बरच काही आहे जे अनाकलनीय आहे. मी एक अतिसाधारण व्यक्तीने त्या बद्दल बोलावं एव्हढि माझी पात्रता नक्कीच नाही . तरीही ज्या अस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या तराजूत सामान्य माणूस त्याला तोलतो त्यापैकी ही नक्कीच नाही . एका मनाच्या दोन पैलूंविषयी मांडलेली एक अतिशय उत्तम अशी ही रचना आहे . एक मन जे सगळे बंधन सोडून धावू पहातंय , त्याला अडवतंय त्याचंच दुसरं मन , जे समाजाच्या चांगल्या वाईट ठराविक कल्पनांनी जकडल्या गेलं आहे , अनेक अनेक वर्षांपासून !!

मला हवी आहे नास्तिकता
पण सहस्त्रवर्षे मनाला मिठी घालून बसलेली
ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून
रंगमंचावरील दिव्यांच्या प्रकाशात
व्याध्याच्या नक्षत्रासारखी
विविध रंगात उमलणारी
सुरेल पदन्यास करीत
माझ्या अंत:करणात प्रवेश करणारी
ती मोहक नृत्यांगना
उभी आहे माझ्या मंदिराच्या दाराशी
पण मालिन वस्त्रे परिधान करून
गहन काळोखात गुरफटलेली
एकतारीवर , एकच गीत गाणारी
ही उदासी मितभाषी ” जोगीण “
मान टेकून दरवाज्याच्या स्तंभावरती
बसली आहे , वाट अडवून
प्रवेशाच्या पायरीवर
मला हवी आहे नास्तिकता
पण सहस्त्रवर्षे मनाला मिठी घालून बसलेली
ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून

~ कुसुमाग्रज

साडी

माझ्या सगळ्या मैत्रिणींना ज्यांनी ह्या उपक्रमात मला मदत केली त्यांना आणि माझ्या आईला ही कविता समर्पित करते !

साडी
आज उगाच नेसाविशी वाटली साडी
आणि उलगडत गेले कपाटातून एक एक घडी
कोणती बरे नेसावी ?
एक होती साडी आणि पोलक्याची जोडी
आणि बांधायला होती त्याला एक नाडी
ते कल्पना साडी वगैरे काय म्हणतात न तेच
मनातच खुदकन हसू आल आणि म्हंटल
ही तर आता नाही जमायची
मग दिसली एक झिरझिरीत
इंद्रधनुषी रंगानी भरभरीत
पानाफुलाच नक्षीकाम केलेली
बिन बाह्याच्या पोलक्याची
मनात अनेक रंगांची उधळण झाली
पण अखेर ती पण बाजूला केली
मग दिसला शालू , भरजरी
स्वतंत्र नाचणारे मोर मोकळ्या पदरी
त्याच्या सुवासात होता , मोगरा , केशर आणि धूप
मन बराच वेळ तिथेच रमत गेलं
पण फार वजनी , नको वाटलं
आणि मग त्यालाही बाजूला सारलं
मग अश्या अनेक , कांजीवरम
पैठण्या , रेशमी उंची साड्या
फक्त घड्या मोडून बाजूला ठेवल्या
मग दिसली एक साडी
सुती कापडाची साधी
मऊ , उबदार , शांत
त्याचा लांबच लांब पदर
कोणत्याही प्रसंगी होईल सादर
साडीवर हलकी गुलाबी छटा
जणू रक्तात दूधाचा वाटा
अखेरीस ती साडी नेसली
आणि आरश्यासमोर उभारली
आणि मनातच विचार आला
आता हा सर्वात मोलाचा
माझ्या आयुष्य पूर्तीचा
एकच असा अनमोल शेला !!

श्रवण स्मृती

लहान मूल झोपेतच रडायला लागतं आणि आईचा आवाज ऐकून झोपेतच शांत होतं , डोळे उघडून ते आईला पाहत नाही कारण आईच्या आवाजाची स्मृती त्याच्या कानातुन कधीच मिटत नाही

सकाळी सकाळी कोकीळ गायला लागलं की कसं बरं कळतं हा कोणाचा आवाज , दर वेळी कोण जात झाडाकडे शोध घेत आवाजाचा , पण त्या कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी आपल्या श्राव्य स्मृतीत घर केलय , नाही का ?

मग दिवसभरात असे असंख्य आवाज भाजीवाले , फळवाले , फुलवाले आणि असंख्य मोटारीचे आवाज , पक्षांचे , प्राण्यांचे आवाज सतत स्मृती जागृत करतात.

आगगाडी , ही आगगाडी आहे ह्याची खात्री करायला ती पहावी लागत नाही , तिचा आवाज तिची खात्री देतो
विमानाला सांगावं लागत नाही मी आलोय ते आपल आपण समजून घेतो

शंभर माणसाच्या गर्दीत , जेव्हा आपलं माणूस आपल्याला हाक मारत तेव्हा लगेच त्या शब्दध्वनीच्या स्मृतीतून आपण त्याच्याकडे धाव घेतो . फोनवरच एक हॅलो आपल्याला न बघताच त्या मनुष्याची ओळख देतं आणि अनोळखी पणा सुध्दा आवाजच सांगतो .

रेडिओ वर गाणं लागत आणि लगेच ” लतादीदी ” असं आपण नकळत म्हणून जातो , कारण त्या मधुर संगीताने आपल्या श्रुतीना कितीतरी वेळा सुखावलं असतं .

आपल्या घरातले सगळेच आवाज आपल्या ओळखीचे , दारांचे , खिडक्यांचे , पडद्यांचे इतकेच काय तर भिंतींचेही !
खरंतर भिंतींना कान असतात , पण कानामध्ये भिंती नाहीत , आहेत फक्त पडदे , शब्दांच्या ध्वनी ने हळुवार हलत राहतात आणि निर्माण करतात निरनिराळ्या श्रवण स्मृती !!

Design a site like this with WordPress.com
Get started