करशील का सांग ना
ह्या मनाच्या वाहत्या निशब्द झऱ्याला रोक ना
अन फुलांच्या पाकळ्याचा तो सडा सांभाळ ना
आसमंती इंद्रधनुष्य का असा तुटका दिसे
रंग त्यातील तू मला समजावून सांग ना
उत्तरे ही वाट बघती प्रश्न थोडे टाक ना
जे कधी होते घडाया डाव ऐसे मांड ना
वादळातच वाहणारे भाव हे वेडे पिसे
त्यास थोडे ओंजळीतच सावरया सांग ना
शुष्क मी धरणी तू घेऊनि ये जलधारांना
सांजसमयी मावळुनी पुनः नव्याने पहाटना
ठेवले आहे जपूनि काही पिंपळ पानाचे ठसे
आठवणीतून तुही काही ठेवल्याचे सांग ना
नको माणिकमोती जवळी असोत भावना
नको फुलांच्या बागा शब्दसुमने आहेत ना
जे जे हवे आहे मला ते ते अगदीच तैसे
शेवटचे मजसाठी करशील का सांग ना