Solitude

The music that’s borne
by the waves
the winds
and giant trees ;
frangarance that travels
With wings through air
reaches your senses
and soothens your thoughts ;
morning chirps that speaks
blue sky that listens ;
and you accept all this
With a sense of gratitude
You really love this solitude

Don’t you ??

पाखरू

कशी येतात पाखरे अन जातात उडून
काही पंखांचे पीस मग देतात सोडून
त्याला कुरवाळीत थोडे हातात घेऊन
कुण्या पुस्तकाची होते त्यानेच खुण

रंग पंखांचे देतात मग हाताला लावून
अन वाऱ्यासंगे एक विराणी गाऊन
सुटलेला श्वास असे जातात सोडून
परतीच्या वाटेहुन रोज येतो परतून

कारे पाखरांनो लळा जीवघेणा लावता
मन रिक्त रिक्त होते तुम्ही सोडून धावता !!

कविता ( शांता शेळके )

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत….

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ( सुधीर मोघे )

क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

असेन मी नसेन मी ( शांता शेळके )

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे

कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे

कुल्फी ( सौम्य जोशी )

लगता है के पिघल गयी मगर नहीं, नहीं, नहीं वो थी जहाँ अब है वहीं कुल्फी, कुल्फी हाँ, मीठी-मीठी माज़ी की कुल्फी

हज़ार तंज़ कस गई हज़ार गाँठ बंध चुकी खुलेगी ना गठरी कभी ये सोचा था, पर खुल गई पिघलेगी नहीं वो कभी कुल्फी

जो चल रहा था थम गया जो थम गया था चल पड़ा उसी पुरानी राह पे फिर से मैं निकल पड़ा पुराने सिक्कों से ख़रीद ली कुल्फी

अभंग ( संत तुकाराम )

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण। मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मने प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥

साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

Check Check

And the teenager speaks with a ” forty is new twenty “
Speak ? Rather an argument …
It’s dreams vs realities
Hopes vs disappointments
Farce vs fallacies
Illusions vs confirmations
It’s not about impatience vs patience
But logics vs peace of mind
The twinkle teases the wrinkle
The only time black snobs at white
Attitude talks to gratitude
The difference ‘
between the two might be twenty or over
But the distance
is just other side of the mirror
And the one thing common is
DISAGREEMENT !!

जो नही कहा गया ( अज्ञेय )


है,अभी कुछ जो कहा नहीं गया ।

उठी एक किरण, धायी, क्षितिज को नाप गई,
सुख की स्मिति कसक भरी,निर्धन की नैन-कोरों में काँप गई,
बच्चे ने किलक भरी, माँ की वह नस-नस में व्याप गई।
अधूरी हो पर सहज थी अनुभूति :
मेरी लाज मुझे साज बन ढाँप गई-
फिर मुझ बेसबरे से रहा नहीं गया।
पर कुछ और रहा जो कहा नहीं गया।

निर्विकार मरु तक को सींचा है
तो क्या? नदी-नाले ताल-कुएँ से पानी उलीचा है
तो क्या ? उड़ा हूँ, दौड़ा हूँ, तेरा हूँ, पारंगत हूँ,
इसी अहंकार के मारे
अन्धकार में सागर के किनारे ठिठक गया : नत हूँ
उस विशाल में मुझसे बहा नहीं गया ।
इसलिए जो और रहा, वह कहा नहीं गया ।

शब्द, यह सही है, सब व्यर्थ हैं
पर इसीलिए कि शब्दातीत कुछ अर्थ हैं।
शायद केवल इतना ही : जो दर्द है
वह बड़ा है, मुझसे ही सहा नहीं गया।
तभी तो, जो अभी और रहा, वह कहा नहीं गया ।

Design a site like this with WordPress.com
Get started