अजुन उजाडत नाही ग, नाही गदशकांमागून सरली दशकेअन् शतकांच्या गाथा गना वाटांचा मोह सुटे वाना मोहांच्या वाटा ग पथ चकव्याचा गोल सरळ वाकुणास उमगत नाही गप्रवास कसला? फरफट अवघीपान जळातून वाही ग अजुन उजाडत नाही ग, नाही ग कधी वाटतेकधी वाटते दिवस-रात्र हे नसते काही असले गत्यांच्यालेखी रात्र सदाचीत्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग …
Category Archives: Borrowed Gems
एक मुलाकात ( अमृता प्रीतम )
मैं चुप शान्त और अडोल खड़ी थीसिर्फ पास बहते समुन्द्र में तूफान था……फिर समुन्द्र को खुदा जानेक्या ख्याल आयाउसने तूफान की एक पोटली सी बांधीमेरे हाथों में थमाईऔर हंस कर कुछ दूर हो गया हैरान थी….पर उसका चमत्कार ले लियापता था कि इस प्रकार की घटनाकभी सदियों में होती है….. लाखों ख्याल आयेमाथे में झिलमिलाये …
जोगीण २ ( कुसुमाग्रज )
कुसुमाग्रजांची ही कविता आता काही दिवसांपूर्वी ऐकली आणि वाटलं , अजून किती आणि काय आहे जे वाचायच आहे ,ह्या एका आयुष्यात त्याची पुर्ती होईल असं वाटत नाही , त्यासाठी एक जन्म अजून घ्यावा लागणार . ह्या कवितेमध्ये नास्तिक आणि आस्तिक अश्या दोन बाजू मांडल्या आहेत पण सरलर्थी ती कविता जशी दिसते तशी ती नक्कीच नसावी …
कसे ? कसे हसायचे ? ( आरती प्रभू )
कसे ? कसे हासायाचे ?हासायाचे आहे मला हासतच वेड्या जिवाथोपटीत थोपटीतफुंकायाचा आहे दिवा हासायाचेकुठे ? कुठे आणि केव्हा ?कसे ? आणि कुणापास ?इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास
मी खरेच दूर निघालो आहे ( ग्रेस )
मी खरेच दूर निघालो आहेतू येऊ नको न मागेपाउस कुठेतरी वाजेहृदयाचे तुटती धागेशेतावर ढग अडलेलाघे त्याला मागून पाणीझाडावर कोकीळ येताघे मागून एक विराणीया फुलपाखारांनाहीते उरेल मरणावाचूनसगळ्याच ऋतूंना मिळतेदु:खाचे उत्कट दान…भरपूर सोडली आहेपडवीत निजेला जागाअन दूर तुझ्याहून दूरप्राचीन फुलांच्या बागा…थिजलेल्या वेळुनमधलालागटेल तुलाही वारापाउस थांबल्यावरहीताऱ्यांच्या पडतील गारा…उध्वस्थ मंदिरे येतीलनजरेत तुझ्या दीप्तीनेखंडानंतर करते पक्षीदिसतील तुला तृप्तीने…माझ्याहून गर्द मिठीचाअंधार …
स्वप्नांची समाप्ती ( विशाखा ,कुसुमाग्रज )
स्नेहहीन ज्योतीपरीमंद होई शुक्रताराकाळ्या मेघखंडास त्याकिनारती निळ्या धारा स्वप्नासम एक एकतारा विरे आकाशातखिरे रात्र कण कणप्रकाशाच्या सागरात काढ सखे, गळ्यातीलतुझे चांदण्याचे हातक्षितिजाच्या पलिकडेउभे दिवसाचे दूत रातपाखरांचा आर्तनाद नच कानी पडेसंपवून भावगीतझोपलेले रातकिडे. पहाटेचे गार वारेचोरट्याने जगावरयेती पाय वाजवतवाळलेल्या पानांवर शांति आणि विषण्णतादाटलेली दिशांतूनगजबज गजवीलजग घटकेने दोन जमू लागलेले दवगवताच्या पातीवरभासते भू तारकांच्याआसवांनी ओलसर काढ सखे, …
Continue reading “स्वप्नांची समाप्ती ( विशाखा ,कुसुमाग्रज )”
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली (वैभव जोशी )
कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांगदेणे घेणे उतू गेले फिटले ना पांगआता कशी श्वासांवर लावायाची बोलीमाझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली कधीकाळी होते इथे एक गर्द रानएका बहराची ज्याने मिरवली आणसरूपाला अरुपाची जाहली सवयतेंव्हाचे हे भय ज्याचे झाले आता वयएका खिळ्यासाठी कुणी जोपासावी ढोलीमाझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली आता माझ्या प्रार्थनेत तेवढा ना …
Continue reading “माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली (वैभव जोशी )”
कधी माझी कधी त्याचीही साऊली ( आरती प्रभू )
ही कविता श्री आरती प्रभू ( चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ) ह्यांनी रचलेली एक अप्रतिम रचना आहे . ह्यातील शब्द भारावून सोडतात. कधी कधी आपण जे बोलतो ते समोरच्याला अवगत होत नाही आणि कधी कधी न बोलता सगळं काही स्पष्ट समजून घेतल्या जात. ही कविता त्या मूक शब्दांची आहे जे कधीच बोलल्या गेले नाहीत . ह्यातील …
Continue reading “कधी माझी कधी त्याचीही साऊली ( आरती प्रभू )”
इतकेच मला जाताना ( सुरेश भट )
इतकेच मला जातांना सरणावर कळले होतेमरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाहीमी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?) मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणीमी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेहीमी …
दोनो ओर प्रेम पलता है
दोनों ओर प्रेम पलता है।सखि, पतंग भी जलता है हा! दीपक भी जलता है! सीस हिलाकर दीपक कहता–’बन्धु वृथा ही तू क्यों दहता?’पर पतंग पड़ कर ही रहताकितनी विह्वलता है!दोनों ओर प्रेम पलता है। बचकर हाय! पतंग मरे क्या?प्रणय छोड़ कर प्राण धरे क्या?जले नही तो मरा करे क्या?क्या यह असफलता है!दोनों ओर प्रेम पलता …