गंधमिश्रित कागदाची फुले असावी हाती
जगाला ते सत्य वाटे जरी असती खोटी
गालावरच्या हास्यालाही गालबोट लागे
म्हणून काट्यामधुनी कळी-फुल जागे
दुःख जसे तळहातावरील जखम एक
सुख जसे खोल मनातील मोरपीस एक
म्हणून मूक राहून भाष्य करावी शांतता
भावनांची उगा तिथे करू नये वाच्यता
टळतील इडा पीडा साऱ्या सटवी सवेत
मोह माया देऊन द्यावा तिच्याच कवेत
जमाखर्च हा भावनांचा मग शून्य करावा
गुणाकार इच्छांचा त्या शून्याला द्यावा
शब्द
शब्द
भांबावलेले ,घाबरलेले ,
दांदरलेले
बोबडे, अडखळलेले
शब्द
अल्हड, चंचल
निरागस , कोवळे
प्रेमळ , स्वच्छ
शब्द
सुटलेले , मोकाट ,
पीसाळलेले ,वाहलेले
अभय
शब्द
लाजलेले , फुललेले ,
मिश्किल
ओठावर येऊन थांबलेले
डोळ्याच्या वाटेने वाहलेले
शब्द
रोखलेले, मोजलेले,
तोलून धरलेले
मापलेले
शब्द
उन्हातून पोळलेले,
पावसात भिजलेले
थंडीत कुडकूडलेले
वाकलेले
शब्द
गारठलेले, कोरडे ,वाळलेले
अनुत्तरित , अनामिक
शांत निजलेले
शब्द
वाहणारी सरिता ,
चांदण्यांचं आकाश
सोनेरी किरणं
वाळूचे कण
शब्द
गुप्त झरा
मृगाची कस्तुरी
वाऱ्याची झुळूक
घेतलेला श्वास
शब्द
हृदयाचे, मेंदूचे
मनाचे ,डोळ्याचे
हाताचे
शब्द
गूढ , निराशा
सात्विक आशा
शब्द
तुझे आणि माझे
बोलणारे आणि मुके
पूर्णतः अपूर्ण
काल आपले आज परके
Rutuja Joshi
पुनर्भेट
नदीच्या पात्राच्या खोल ,कुठेतरी खाली तळाला
सूर्य जिथे मावळतो त्या डोंगराच्या पायथ्याला
झाडाची मूळ जिथे जाऊन संपतात तिथे
पावसाच्या थेंबांची सुरवात होते जिथे
श्वासाच्या आतल्या खोल भागात
फुलाचा सुगंध सुटतो जिथून
समुद्राच्या शेवटी कुठेतरी
कुठेतरी नक्की होणार
तुझी नि माझी
ती एक
पुनर्भेट !!
जाsssssगते रहो
जाsssssगते रहो
( कौन )
जो माँ है , जो बेटी है
जो बेटीयो की माँ है
जो सास है जो बहू है
बहुओ की सास है
जो बुढी है जवान है
नादान है समजदार है
जो अबला है या
पुरी तरह सबला है
साडी का रंग चाहें
लाल है सफेद है
चेहरा उसका दिखता है
या बुरखे मे छुपता है
जो काली है या गोरी है
सुनती चाहे अभि तक
माँ की वो लोरी है
जागते रहो
( कहा )
टॅक्सी मे , बस मे
ट्रेन मे , प्लेन मे
भीड मे अकेले मे
गाव मे गली- कुचे मे
शहर के मेले मे
घर आंगन में या छत में
ऑफिस मे , पार्क मे
सिनेमा हॉल मे या मौल मे
मंदिर या अस्पताल मे
पाठशाला या कॉलेज मे
आकाश या जमीन मे
पानी या पाताल में
जागते रहो
(कब )
दिन हो या रात हो
शाम या सवेरा हो
त्योहार हो
या मय्यत हो
खुशी हो गम हो
जान हो पहचान हो
या पुरी तरह अंजान हो
दोस्त हो दुश्मन हो
या नाता कोई दूर का हो
जागते रहो
(किसलीये )
मान के लिये
अभिमान के लिये
सम्मान के लिये
स्वाभिमान के लिये
आचार के लिये
विचार के लिये
अहंकार के लिये
इन्कार के लिये
ना करे कोई
व्यभिचार
उसके लिये
जागते रहो
( कैसे )
खुले रखो …..
नकी सिर्फ आंख
पर कान भी ,नाक भी
पैर भी हाथ भी
सोच भी होश भी
दिल भी दिमाग भी
खयाल भी
एहसास भी
शक करो हक से
चिल्लओ जोर जोर से
जागते रहो
( क्यू )
न बदला है न बदलेगा
ये समाज युही रहेगा
जो आज है कल होगा
तुम सोना नही रोना नहीं
झूठे सपनो मे खोना नहीं
तलवार पर धार रहे
आंखो मे अंगार रहें
कोई छिन न ले
रुह को तुम्हारी ,
ये शक्ती तुम्हारी,
पहचान तुम्हारी
तो दिखलाने
आवाज तुम्हारी
जाsssssssगते रहो !!!
भीती
भीती एक छाया
भीती एक सावट
ती अदृष्य काया
अन
लागलेली जळमटं
भीती देव मानते
पाप पुण्य जाणते
काळे धागे बांधते
टिट लावते
ती पाठीशी असते
साथ देते, हात धरते
मनाच्या कोपऱ्यात
शांत दडून बसते
ती कर्तव्याची जाणीव भासवते
ती धैर्याची उणीव खुणावते
भीती कशाची?
रात्रीची का काळोखाची
का उजेडाच्या अभावाची
सूर्य उगवता मावळण्याची
शांततेची का कोलाहलाची
माणसातील दैवी शक्तीची
का देव माणूस नसावा ह्याची
मरेपर्यंत जगण्याची
का मृत्यूरहित आयुष्याची
दुःख सोसण्याची
का ओसरणाऱ्या सुखाची
भीती निष्कलंक चारित्र्याची
अनामिक अहंकाराची
अतृप्त स्वाभिमानाची
सुटकेची का अटकेची
स्वावलंबनाची
का परावलंबनाची
उत्तिर्ण झालो तरी तेच
अनुत्तीर्ण झाल्यावर मग काय?
सौंदर्याला आरशाची आणि
श्रीमंताला गरिबीची
मनातल्या अंगणात अमुक येऊन
भीती नावाचं बी पेरतो
आणि आपण प्रामाणिक पणे
त्याला खत पाणी घालतो
मग आपल्याच शरीर नावाच्या
वटवृक्षाला त्याच्या पारंब्या
लटकत राहतात
शरीराला मरण येतं
पण भीती अजरामर आहे
त्याला वाळवी खात नाही
कारण पूर्वी रुजलेल्या पारंब्या
नवीन रोपट्याना जीव देतात
आपण भीती परजतो
आणि वाटतो पण
पोटात भीती घेऊन जगतो
आणि भीतीपोटीच मरतो
असत्यातून जन्मलेले शाश्वत सत्य म्हणजेच भीती !!!
NIRVANA
He sat where he found solace
Under a fig tree he got a place
A day when he tried to walk away
The reality of life was at bay
Life comes with death is a truth
Old age will follow your youth
He thought it’s all rosy and pious
Unless he sees, something hedious
I am no immortal like any other
Let me go out and feel the wither
He knew what he has left behind
He was ready to face the grind
Nothing is permanent not even breath
So I leave the mansion with my wealth
That’s when he sat where he found solace
That tree where he got a very little space
Now he is strong and not frightened
He didn’t know he was enlightened
O buddha I am no different than you !!
Please take me along make me you !!
Rutuja
प्रणय गीत
विरहात आठवणींचं तारुण्य उफाळून येत
आणि मग त्यांचा मनाशी संभोग होतो
त्यावेळी जे शब्दांचे आत्मे भटकत असतात
ते जन्म घेतात हृदयाच्या गर्भाशयातून .
त्या नवजात शिशूला धर्म , जात , पंथ,
काहीच नसत
असतो तो फक्त एक भाव आणि एक जाण
मौनांची धरणं तोडून सुटलेल्या प्रवाहाची
प्रणय गीताची गंगा भेदभाव करत नाही !!
Serendipity
Cuckoo bird singing on a lousy morning
A cup of warm coffee on a cold evening
A call from a friend a letter from a loved one
Heartfelt message from special someone
few fragrant flowers you get unexpectedly
When a stink of some unwanted incidences are troubling you badly
A warm blanket of words a cushion of appreciation for small deed
A story that you relate from a book you read
All through the day a song you keep humming
You switch on a radio where it’s running
Don’t see the world being a masquerade
All you will see is one grey shade
Just look around and check each entity
Life gives many chances to experience serendipity !!
मीच बुडवले ( कवि : इंदिरा संत )
ऐकून घेणारा तू , समजून घेणारा तू
तुझ्याचपाशी म्हणून वागले म्हणून बोलले,
उगाच काही
खुळे भाबडे , भान मोकळे अर्थशून्यही
मुरडून थोडे नाक बुद्धीचे ,
हसून थोडे उपहासाचे
म्हणालास तू , सांगशील का मोजून मजला
ह्या उथलपणाची खोली
गळ्यात आला एक आवंढा
डोहच काळा उथलपणाचा
भिडले काळे पाणी येऊन काजळावरी,
आणि तुला मी
मीच बुडवले त्या डोहांमध्ये
उंच तुझ्या हिमशिखरासह !!
एक हवे मज ( कवि : इंदिरा संत )
एक हवे मज ( कवि : इंदिरा संत )
एक हवे मज , एक हवे मज
दुःख हवे मज असेच काही
जखम जयाची सदाच ताजी
तीव्र वेदना घुमवित राही
नको तशी ती कधी भराया
नको बधिरता त्या जखमेवर
नकोत टाके तिला जुळाया
नको तिच्यावर शीतल फुंकर
असा असावा दाह तिचा पण
निळी तांबडी एकच ज्वाला
बेभान पणे अंधारातून
तुझ्याकडे ती आणील मजला