ट्रॅफिक सिग्नल

काश दिमाग मे भी होता एक ट्रॅफिक सिग्नल
आने जाने वाले यादो को नियंत्रण मे रखता ।

कुछ जो लुभवानी है उसे लाल बत्ती दिखाकर रोक लेते, जो मन को विचलित करे परेशान करे उन्हे हरी बत्ती दिखाकर रवाना कर देते ।
और कुछ वो यादे जो मन को खुश तो नही रखती पर उनके रहने से अपने होने का यकीन होता है  , उनके लिये  नारंगी बत्ती जलाकर कुछ पल अपने पास रख लेते ।

पर उसमे भी होंगे कुछ खुराफाती जो लाल बत्ती मे भी निकल जाये और पीछे छोड जाये उन्हे जिनके लिये हरी जलाकार रखी है !

चूक

माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा घटक
त्याशिवाय कशालाच अर्थ नाही
त्याशिवाय कशालाच पूर्णता नाहि
विषय सुरु होताच संपतील
चुरस नाहीशी होईल
सगळे एकसारखे , साच्यातून काढल्यागत
भासतील
चूक , हि माणसाची चूल आहे
ती पेटते तेव्हाच अन्न तयार होता
भूक असेल तर चूक हवीच
चूक एक जिना आहे
एक एक पायरी चढता
एक एक क्षण गोळा होतो
अनुभव मिळतो
चूक हा एक गुरु आहे
माणूस चुकतो तेव्हाच तो शिकतो
चूक म्हणजे
माणसाला माणसाची ओळख करणारी
आणि माणसातला देवत्व काढून त्याला
एक असाधारण व्यक्तिमत्व देणारी !

शुभ्र

सगळ्यांना हवं असतं एक आयुष्य
अगदी पांढरं फटक
तिळाच्या कणाइतकही डाग नसलेलं
शुभ्र सुंदर स्वछ
एका साध्वीच्या परिधानासारखं
अंतर्बाह्य तेजस्वी, निष्कलंक
द्वेष देणाऱ्या त्या शांत नेत्रांचं

पण तसं मिळत मात्र नाही
पदरी येत ते एका अकालीन
अवेळी , अगदी तारुण्यात
विधवा झालेल्या
स्त्री च्या वसनासारखं
पांढरा शुभ्र देखावा
अंतरी नुसता कोलाहल
कुचंबळलेल्या भावनांचं
विटलेल्या इच्छांचं

मनात सतत भीती
त्या शुभ्र वसनाला रंग लागेल का
ह्याची सतत घालमेल
किंवा पांढऱ्या वस्त्राचाही
कधी रंग उतरेल का
हि विवंचना….

शेवटी उरतं मात्र एकच
गारठलेल्या देहावर चढवलेल्या
निश्वास पोकळ
चादरीसारखं …

इतवार

एक इतवार की छुट्टी कब आये कब जाये , पता न चले
सारा हफ्ता उसके इंतजार मे निकल जाये और वो आकर हाथ छु कर गुम हो जाये
कूछ मुलाकाते भी ऐसेही होती है, इतवार जैसी
या फिर ऐसे ,जैसे पेड से गिरे पत्ते , जो सुखे है पर हलकी सी बरसात मे फिर भीग गये
या तो कडी धूप आये और वो पुरी तरह सुख जाये ,या मिल जाये ऊस मिट्टी मे जहाँ से वो आये है
सोचती हू उन्हे इकठा कर एक जगह गाढ दु
पर क्या करे आजकल इतवार भी तो नही आता !!

मी ठीक आहे ?

बस बाकी मी ठीक आहे

फक्त आता मोगऱ्याच्या फुलात सुगंध जाणवत नाही
ओल्या मातीच्या सहवासात मन फारस रमत नाही
पण मी ठीक आहे

गुणगूणताना मनाच्या कोपऱ्यातून आवाज येत नाही
ताल सूर कुठलेही मनाला चेतवून सोडत नाहीत
पण मी ठीक आहे

आता अस मनमोकळे पणाने हसायला येत नाही
अरे मनातून खुलके रागावता पण येत नाही
पण मी ठीक आहे

सूर्य उगवतो ,  मावळतो त्याची वेळ चुकत नाही
दिवस पल्याड उभा पण रात्र काही जात नाही
पण मी ठीक आहे

सुगीचे दिवस आले होते कधी, हिरवळ आलीच नाही
पावसाने केलेलं थैमान, पण चिंब भिजवलं नाही
पण मी ठीक आहे

आयुष्याला नतमस्तक झाले पण डोळे मिटले नाहि
आला दिवस घालवताना काही क्षण टिपलेच नाहीं
तरीही मी ठीक आहे , ठीकच आहे ना ….

पिंपळपान १

मनातल्या भेटीचा पुरावा देता येत नाहि
आठवणींचा कधी आढावा घेता येत नाही
काही नाती अनामिकच पूर्ण असतात
त्यांच्या न्यूनतेतच ते नूतन असतात
दोन समान रेषा कधीच जुळत नाहीत
म्हणून त्या स्वतःला दुरावत नाहीत
भेटल्याने बोलाल्याने संवाद होतात
पण ते न केल्याने काही थांबत नाहीत

सखे सोबती सतत सोबत असतात
कधी हास्याच्या ठहाक्यातून, कधी फुगलेल्या गालातून
कधी केलेल्या कोटीतून कधी एखाद्या विनोदातून
नाहीतर एखाद्या कवितेच्या वाहितील पिंपळपान बनून !!

भ्रम

रात्रीच्या काळोखात पडलेलं एक स्वप्न

रंगबिरंगी मोरपीस , पावसाची ओली माती आणि त्यात बेधुंद नाचणारा मोर

सार कसं हवंहवंसं , जणू काही मनाची झापडं आपोआप उघडून निसर्गाचा आनंद घेत आहेत .

हिरवंगार रान आणि त्यात उमललेली कोवळी पालवी , फुलांचे ताटवे आणि पांढरा शुभ्र झरा, ओसंडून वाहणारा. झऱ्याच्या खाली एक छोटीशी नाव , नदीच्या पल्याड ,दूर नेणारी .

काळोख संपला , सकाळची किरण डोळ्यावर पडली , मनाची झापडं बंद झाली आणि डोळे उघडले.

समोर रान होत पण भिंतींचं, नाव होती पण बुडत आलेली.

आणि पायाखालची माती ओली होती पण दलदलीची,

मोरही होता , पण पांढरा !!!!

वनी एकटी दमयंती

कवी: गंगाधर महांबरे

काय विधीची दैवगती , वनी एकटी दमयंती

कोमल शय्या मृदुल तृणांची
श्रमवी काया दमयंतीची
व्याकूळ नयने शोधीत राही प्राणविसावा निषधपती

कोठे असशी प्राण वल्लभा
दीप तू सख्या मी तुझी प्रभा
हाक ऐकुनी येशील का रे , विनवी अजुनी किती

किंचित खुलली नयन पाकळी
पण नव्हता नलराजा जवळी
अश्रू विरही झरती गाली , शिणवू आपुले नयन किती

ते शीतलोपचारी जागी झाली ,
हळूच मग बोले ,
औषध नलगे मजला .. औषध नल -गे मजला
परिसुनी माता , बरे म्हणुनी डोले .

करून पहा

पाण्यालाही हवी असते थोडी माया
झाडही मागतो कधी थोडीशी छाया

फुलाला वाटत घ्यावा दुसरा सुगंध
मातीला वाटत घ्यावा दुसराच गंध

आकाशाला पण लागत  पांघरूण
कुबेराला असेल कुणाचतरी ऋण

पक्षाला द्यावी कुणीतरी उंच भरारी
वाऱ्याला घ्यावं अलगद हातावरी

डोळ्यांना द्यावी मनाची चाकरी
मेंदूला द्यावी कधी हृदयाची उधारी

कधीतरी आपली कर्तव्य सोडून जगावं
आपलं आपल्यात न ठेवून देऊन द्यावं

सुन्न

नाही कुठला आवाज सगळं कसं शांत
पश्चिमेला केशर पसरून रम्य  दिगंत

पक्षी परतीच्या वाटेला घरट्याच्या दिशेने
काळोख चढतोय हळूच आभाळ वाटेने

आता पुन्हा एक काहूर उरात साचणार
मनाची पाऊलं खोल आत शिरणार

अंधाराशी हितगुज करायची वेळ येते
हृदयाच्या ठोक्याची मग जाणीव होते

दिव्याची काजळी काळोखाला मिळते
दिव्याखाली अंधाराची वात जळते

मग एकच विचार आणि मन कसं खिन्न
हाकेवर कोणीच नाही सार कसं सुन्न

Design a site like this with WordPress.com
Get started