प्रेम म्हणजे !

प्रेम म्हणजे नक्की काय !

प्रेम म्हणजे एक नावाची आशा आणि अनामिक निराशा. वास्तवाशी काहीही संबंध नसणारी एक अनुभूती म्हणजे प्रेम. खोट्या भाकड कथांवर विश्वास ठेवायला लावणारी एक आजीच्या गठोड्यातली गोष्ट म्हणजे प्रेम. नकळत मांजरीच्या पावलाने मागच्या दारातून आत शिरणारी चोरटी म्हणजे प्रेम. सुगीच्या दिवसात उगाच पिकासोबत गवत उगवत तसं त्याचं अस्तित्व. का येत कोणास ठाऊक आणि का वाळत ते पण नाही माहिती. ते होतंय हे कळायच्या आधिच ते झालय असा संदेश येतो. त्याच्या अस्तित्वाचा डंका उडवत कधी फुलाच्या गजऱ्यातून तर पावसात भिजत असलेल्या छत्रीतून. त्याला वयाच काळाच मोजमाप ठाऊक नसतं. शरीराच्या अवयवांवर कर्करोगासारखा झपाट्याने वाढत जाणारा विषारी दंश म्हणजे प्रेम.

तरीही इथे तिथे न पडता आपण प्रेमातच पडतो , मग तेे वेळ , काळ काही बघत नाही.
सुखचा एक क्षण उपभोगण्यासाठी दुःखाचा पुर लोटायला लावणारं हे प्रेम मनुष्याच्या जीवनातला एक तिर्हाईत आहे, जोवर मजा येते तोवर बघायचं आणि मग हाल हाल नुसते.

आजूबाजूला लाखो चेहरे घुटमळत असले तरी त्या गर्दीत एकच चेहरा शोधायला लावतं ते प्रेम. मनातल्या आकांशा नकळत जगासमोर आणून आपली फजिती करत ते प्रेम , हो तेच ते …तुमच्या रात्रीच्या झोपेचं पार कचरा करत ते . कशाला हवीय ही नसती उठाठेव आयुष्यात , ह्याशिवाय नाही का जगता येणार सुखाने ? असा प्रश्न मी स्वतःला  विचारते , डोक्याचा भुगा पडलाय पण प्रेमाचा भुगा मात्र काही होत नाही ते फुगतंय ,फुग्यासारखा , त्याची दोरी आता त्याच्या मालकाच्या हातातुन निसटली आणि आता ते दिशाहीन फिरतय!!

Ulterior





If You have a teenager at home and if it’s a girl , then may be you can relate with these lines . (Please read M = mother , D = daughter , UM = ulterior meaning)



Ulterior

( author ~ unknown )



D – mom I have an invitation for a birthday party that’s  tomorrow evening , from one of my classmate ( boy ),I hope that’s fine with you ?



M – yes , yes  why not ? You can go .



(UM – oh god ! Why do people celebrate birthdays ? )



M – how many of  you are going for this from your friend circle ?



(UM – basically how many boys ? Their names , phone numbers, their parent’s numbers and emergency contact details ..If the count of boys is more than girls ..Is there anyone whom we don’t know ..Any stranger ? )



D –  we are 10 .  ok so let me inform them , that I am coming



M – sure ! Let’s buy a gift for him



(UM – the price , choice , pattern of the gift will decide how important that person is )



D – No we are not gifting him anything !



M – oh ok



(UM – sigh of relief , phew !! )



M – ok please let me know if you need anything after you reach there



(UM – basically call me once you reach , call me when you sip water and eat chips , call me before and after your meal and keep calling me every 30 mins , as I hardly trust this world and people over here , as you are the most precious thing I have and just can’t see you troubled or harmed , not only physically but mentally emotionally also , as even i am a girl and I know the challenges we have to face being a girl in this society , as people who speak good things about you may not mean that , they may have different ULTERIOR MOTIVES , as you will be mistaken for your Frank and bold attitude , as you will tagged by some adjectives by the kind of clothes you wear ,the words you speak the friends you choose..And many such things . So whenever you need me I am there , I am there till my last breath,  because I need you more than you need me . )



D – Mom ! Sure I will let you know.



(UM – I know mom what you are thinking , but trust me I will be careful )












मी हसत होती तेव्हा !

मी हसत होती तेव्हा पावसातही लय होती
थेंबात मोती आणि मातीत सुगंध होता
गुलाबाच्या काट्यांना विषारी दंश नव्हता
दुधामधे मिठाचा जराही अंश नव्हता
उन्हात  पोळत असतानाही व्रण  नव्हते
मनावर फुटक्या  नशिबाचे ताण नव्हते
उरापोटी निजताना स्वप्नांची उशी होती
अश्रूंकडे मान वळवणारी कुशी होती
गोष्टींमधली परी खरोखर सुंदर होती
वास्तविक नसलेलं सुख ती भोगत होती
मी हसत होती तेव्हा मी जगत होती
मी आभाळात उडताना मातीची होती
डोळ्यादेखत सुख होता तेव्हा मी हसत होती
ओली माती समजून दलदलीत फसत होती

त्यानंतर मी हसलीच नाही !!

गहिवर

येता गहिवर होते अनावर
दुःख ओलिते अजून
समजेना
मनी प्रश्नाचा काहूर
उरी बोचते टोचून
सोसवेना 
उगा होईल बोभाटा
सारे ऐकतील जन
बोलवेना
तरी अशांत झोपेत
रात्र सरते जागून
झोपवेना
पाय थकले ते आता
साथ सुटे वाटेतून
चालवेना
सोडावी ही विवंचना
श्वास जाती प्राणातून
जगवेना !!

काहूर

काय होते हे मनात कशी झाली तळमळ
जशी वादळात होते वाऱ्याची खळबळ
मागे पाहता वळून दिसे अंधार अंधार
पुढे प्रश्नांचा डोंगर अन पल्याड विहीर
पाय टाकता पुढ्यात वाट धूसर धूसर
अन मनात साचला एक काहूर काहूर


पत्र लिही पण ( इंदिरा संत )

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशान्च्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.
चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून
शब्दामधूनी नको पाठवू अक्ष्ररामधले अधीरे स्पन्दन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कम्प विलक्शण
नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सान्गीतले मी : तू हट्टी पण !
पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मीळते
पत्र त्या नन्तरचे मग वाचायाचे राहून जाते

त्या गावी जाताना

त्या गावी जाताना
सुख नसावे
दुःख नसावे
नकोत कुठले भाव 
लोभ नसावा
मोह नसावा
नको कशाचा ताव

मित्र नसावे
वैर नसावे
नकोत नाती गोती
साथ नसावा
हाथ नसावा
नकोत चालीरिती

देह नसावा
दाह नसावा
नको कशाची लाज
सूर नसावे
गीत नसावे
नकोत कुठले साज 

त्या गावी जाताना
एकच अश्रू
तव नेत्रातून
घेऊन जाईन
जाताना 
तृप्त होऊन मुक्त व्हावया
आत्मा अवघा शुद्ध कराया

तू ! (पिंपळपान २ )

तू ! माझ्या कोऱ्या वहीच्या पानावर नकळत उमटलेली एक कविता.
शब्द ना अर्थ , यमक ना सूर
फक्त भाव !!
मनातला एक कोपरा रिक्त होऊन वहीच्या पानावर उमटलेला,
काळजाच्या ठोक्याचा नकळत वेग वाढवत धमन्यांच्या माध्यमातून बोटात आलेलं ते एक हस्ताक्षर .
ओघओघाने वाढत गेलेलं , आणि अंती  कविता नामक रूपाने  माझ्यासमोर येऊन उभा राहिलेलं .
माझ्या कवितेतील अक्षर तुझ्या संवादातून टिपलेले काही क्षण . माझ्या कवितेतील संदर्भ , तुझ्या अनुभवातून उमटलेल्या खुणा. माझी कविता माझी नसून तुझ्याच कवितेच्या वाहितल एक पिंपळपान !!

काळ

कधी वाटते पत्र लिहावे
कधी वाटते नको तसे ते
का वाटते निमुटपणाने
जाऊन यावे त्या गावी
कधी आठवण येते जाते
भेटीची का ओढ लावते
तसे न घडता उगा मनाला
हुरहुर का वाढून जाते
बोल बोलता शब्द नसावे
वेळ तरीही सरून जाते
हाती येतो रिक्तपणा
भरून येति फक्त डोळे
अंतरात ह्या कोलाहल
कधी शांत वा चंचल
क्षणिक सुखाला वेचून
काळ जातो निसटून

छुट्टी

चलो ऐसा करे , दिन भर की छुट्टी ले और घुम आये कही ।

चलते है ना ऊस जगह जहाँ बचपन खेल रहा है अब तक, आम का पेड छाव देता है , माँ की डांट से छुपने की जगह देता है ।

चलो वो दिवार फांद कर कुल्फी वाले को रोकते है ,वो निकल गया तो दुसरा कल आयेगा , और छुट्टी तो बस आज की है ।

या फिर यु करे बागीचे मे जाकर लुकछुपी खेले, इस बार मैं छुप जाऊ तो जल्द खोज लेना , समय कम है और फिर दिन भी तो एक ही है ।

सायकल का पिछला पहिया थोडा तेढा हो गया होगा , कबसे वो झुककर खडी होगी , उसे थोडा सिधा कर फिर एक चक्कर लगाये । शाम होने तक वापस आते है , एक बार घर मे रोशनी हो जाये , सब दरवाजे खोल के , आंगन वाले छोटे फाटक से निकल जाऐंगे । बडे फाटक मे जंग लगी है ,खोलने मे वक्त निकल जायेगा , और छुट्टी खतम हो जायेगी ।

चलो चलना है , या तो तुम तसवीर से बहार आवो या मैं तसवीर बन जाऊ , एक दिन की तो बात है !!

Design a site like this with WordPress.com
Get started