संक्रांत

उंच भरारी निळ्या आकाशी
पाय ठेवून खाली जमिनीशी
उडताना सांभाळ स्वतःला
साद घालून त्या गगनाला
नाजूक हळवे मन कागदी
अलगद वाहे वाऱ्यावरती
मावळता अरुण संध्येला
परत येति सारे धरणीला
अशीच असे चढाओढ जीवनाला
पतंग शिकवी हेच आपणाला !!

नज्म

अभी रुको अभी पूरी तरह से टूटा नही है ये
अभी  आखरी खत का आखरी पन्ना बाकी है
चाय की चुस्कियों में अभी गरमाहट बाकी है
वो जो आखरी गीत गाया था , उसका एक अंतरा बाकी है
किताब जो खत्म हो रही है उस कहानी का
अंतिम चरण अभी पढ़ा नही
पौधा अभी ठीक से जमीन में गढ़ा नही
बारिश ने अभी आधा भिगोया है
आधा हिस्सा अभी सुखा है
कांच की गिलास में जो रंगीला शरबत है
उसमे अभी नशा भरना है
खाने में तीखा खा लिया , मीठा खाना
अभी आना है
सूरज ढलते देख लिया , रात की चांदनी में
रोना है
ये सब हो जाये तो वो पूरी तरह टूट जाये
तब तक इस आधे टूटे दिल का मैं क्या करूँ
ऐसा करो तुम रखलो
शायद तुम्हारी किसी आधी नज्म को पूरा करदे !!

मोकळं

एक कविता लिहून मोकळी केली
जसा एक श्वास अडकला होता
एक भाव निघता निघत नव्हता
काही विचार जगापुढे मांडता आलेच नाही
काही नियम कधी मोडता आले नाही
रस्ते चुकीच्या वळणावर गेलेच नाही
वाटा पायाखाली संपल्या कधीच्या
पण चालायचं थांबवता आलाच नाही
बंद दारांची चावी हातात असून
उघडण कधी जमलंच नाही
तेव्हा हातात लेखणी घेऊन
कागदी आयुष्याच्या पाटीवर
काही अक्षरांची मांडणी केली
त्याच्या अनेक प्रतिकृती निर्माण केल्या
आणि वाहणाऱ्या नदीला अर्पण केल्या
कविता मोकळी झाली का कवि
हे मात्र ठरवता आल नाही

जोगीण ( कुसुमाग्रज )

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.

__कुसुमाग्रज

माझी कविता

तू देतेस मला धैर्य, तू देतेस मला साथ
माझ्या एकटेपणात , तूझा  पाठीशी हात

तू मोलाची फार, जरी उमगली ना उमगली
तुला कशी सोडू मी तू माझीच साउली

तुझ्या हाती दिली मी माझी ललाट रेषा
दिसती वेगळी जरी ,पण तुझी एकच भाषा

तू आलीस कि उन्हाळाहि सोसवतो
तू नसलीस कि पाऊसहि कोरडा जातो

दुःखात देतेस मला भावनांचा दिलासा
तू दाखवतेस मला माझ्या मनातील आरसा

तू माझ्या आयुष्याच्या जमा खर्चाचा भत्ता
अंधारातही वाट दाखवणारी तू माझी ” कविता”

प्रश्नोत्तरे

सुख म्हणजे काय !
कोरड्या वाळवंटात एक छोटं निरस
नेमका त्यात दिसणारा पूर्ण चंद्र
आणि मंत्रमुग्ध करणारा प्रकाश
चमचमणारे वाळूचे कण
शांत रात्र आणि संथ वारा
सुख !

ओढ कशी असते ?
झुंझुमुंजू होण्याआधीची वेळ
पक्षांचा हळुवार आवाज
थोडी काटेरी थंडी
साखर झोप असताना
सूर्यकिरणांनी येऊन जागवावं
आणि हळूवार येणारी ऊब
ती ओढ

तृप्ती ?
खडकाळ डोंगर
आणि काही काटेरी झुडूप
दुरून येणारि खळखळ
कोसळणाऱ्या झऱ्याची
त्या आवाजाच्या दिशेने धाव
रुतणारे काटे आणि दगड
आणि मग अचानक समोर येणारा
पांढरा शुभ्र फेसाळ निसर्ग
त्यात अंतर्बाह्य न्हाहून निघणे
म्हणजेच तृप्ती

साधना म्हणजे नक्की काय?
सुंदर मोहक मोगऱ्याची बाग
छोटी सुबक झुडूपं
आणि टिवटीवणारे फुलं
त्याचा नाजूक देखावा
आणि त्याला स्पर्श न करता
त्याचा सुगंध अनुभवणं
आणि त्यात रमून जाणं
हीच खरी साधना






मौसम

एक सुहाना सा भरम हुआ था
कच्ची नींद का ख्वाब देकर चला गया
वो थमता या रुकता अब किस लिए
मौसम था समय होते ही बदल गया
यकीन टूटने पर आवाज तो नही होती
वो क्या शोर था जो नींद से जगा गया
यू तो मेरा ईमान कतई बिकाऊ नही
बस इसबार खरीदार अच्छा मिल गया

गांठ

वो बांधता तो अनगिनत है
हमें खयाल सिर्फ सात फेरों वाली का है
उसकी परवरिश में हमने
बाकियो को नजर से परे रखा है
न सीरत ,न नीयत, न शकल न अकल
वो बिना देखे बस बांधे जाता है
नाचने के अलावा और क्या करे
कठपुतलियों का खेल  ऐसेही होता है
हर गांठ का कोई नाम तो नही
पर हर बंधन की एक गांठ पक्की है
एक गांठ जो टूटे नही कभी
जो रस्सी को दोतरफ़ा खेंच रहे है
वो तो टूटने से रही
बस खींचातानी में अदृश्य हो रही है
और शायद और मजबूत भी !!




सारथी

चलो हम सारथी बनते है
दो पहियो की गाड़ी
पुराने यादो की छत
खट्टी मीठी बातो की डिबिया
छोटे छोटे लम्हो की गठरी
आंखों के मोतियों की माला
सुहाने कल का जल 
अरमानो की पगदंडियों पर
अपने भविष्य के रास्ते पर
एक साथ चलते हुए
ख्वाबो को हकीकत तक
लेके चलते है
चलो हम सारथी बनते है


ये साल अच्छा था

मौसम अच्छा था ,सफर अच्छा था
नजर का धोखा अच्छा था
बाते अच्छी थी मुलाकाते अच्छी थी
मृगजल की तृष्णा अच्छी थी
दिल का भरम के उसका रहम अच्छा था
कौन जाने करम अच्छा था
सोच ,विचार, आचार,प्रचार  अच्छे थे
कलमकार वो सारे अच्छे थे
मिलकर बिछड़े लोग अच्छे थे
मेल मिलाप अच्छे थे
प्यार ,इकरार , इजहार अच्छा था
बेवफाई का इन्कार अच्छा था
कहनिया, किस्से , वाकिये अच्छे थे
अनगिनत झूठे वादे अच्छे थे
खुश रहने का प्रयास अच्छा था
बीता हर लम्हा सच्चा था,
जो गुजर गया वो साल अच्छा था
आनेवाला साल भी अच्छा ही होगा

” एक ब्राह्मण ने कहा है के ये साल अच्छा है दिल के बहलाने को ये खयाल अच्छा है ! “












Design a site like this with WordPress.com
Get started