मीच बुडवले ( कवि : इंदिरा संत )

ऐकून घेणारा तू , समजून घेणारा तू तुझ्याचपाशी म्हणून वागले म्हणून बोलले,उगाच काही खुळे भाबडे , भान मोकळे अर्थशून्यही मुरडून थोडे नाक बुद्धीचे ,हसून थोडे उपहासाचेम्हणालास तू , सांगशील का मोजून मजला ह्या उथलपणाची खोली गळ्यात आला एक आवंढा डोहच काळा उथलपणाचाभिडले काळे पाणी येऊन काजळावरी,आणि तुला मी मीच बुडवले त्या डोहांमध्येउंच तुझ्या हिमशिखरासह !!

एक हवे मज ( कवि : इंदिरा संत )

एक हवे मज  ( कवि : इंदिरा संत ) एक हवे मज , एक हवे मज दुःख हवे मज असेच काही जखम जयाची सदाच ताजी तीव्र वेदना घुमवित राही नको तशी ती कधी भराया नको बधिरता त्या जखमेवर नकोत टाके तिला जुळाया नको तिच्यावर शीतल फुंकर असा असावा दाह तिचा पण निळी तांबडी एकच ज्वाला …

Design a site like this with WordPress.com
Get started