वाटते क्षणा क्षणात श्रावण एक असतो
भिजवून अर्धे मुर्धे ,पुन्हा रुक्ष करतो
तो तळ्या-मळ्याचा खेळ वेड पांघरून येतो
अन बघतो दुरून सारे, साऱ्यातून दूर राहतो
कोवळ्या उन्हाचे छाप हातात लपवून येतो
ओंजळीतले गार पाणी सोबतीला घेऊन जातो
मन भरून येते ऐसे जीव अभाळागत होतो
वरवरी ओली माती अंतरी कोरडी करतो
रे श्रावणा ! तू का घोर जिवाला देतो
घे बरसून आता पूर्ण सृष्टीचा ऋतू बदलतो !!