पुनर्भेट

नदीच्या पात्राच्या खोल ,कुठेतरी खाली तळालासूर्य जिथे मावळतो त्या डोंगराच्या पायथ्यालाझाडाची मूळ जिथे जाऊन संपतात तिथेपावसाच्या थेंबांची सुरवात होते जिथेश्वासाच्या आतल्या खोल भागातफुलाचा सुगंध सुटतो जिथून समुद्राच्या शेवटी कुठेतरीकुठेतरी नक्की होणारतुझी नि माझीती एकपुनर्भेट !!

भीती

भीती एक छायाभीती एक सावटती अदृष्य कायाअनलागलेली जळमटं भीती देव मानतेपाप पुण्य जाणतेकाळे धागे बांधतेटिट लावते ती पाठीशी असतेसाथ देते, हात धरतेमनाच्या कोपऱ्यातशांत दडून बसते ती कर्तव्याची जाणीव भासवतेती धैर्याची उणीव खुणावते भीती कशाची? रात्रीची का काळोखाचीका उजेडाच्या अभावाचीसूर्य उगवता मावळण्याचीशांततेची का कोलाहलाची माणसातील दैवी शक्तीचीका देव माणूस नसावा ह्याचीमरेपर्यंत जगण्याचीका मृत्यूरहित आयुष्याचीदुःख सोसण्याचीका ओसरणाऱ्या …

प्रणय गीत

विरहात आठवणींचं तारुण्य उफाळून येत आणि मग त्यांचा मनाशी संभोग होतो त्यावेळी जे शब्दांचे आत्मे भटकत असतात ते जन्म घेतात हृदयाच्या गर्भाशयातून .त्या नवजात शिशूला धर्म , जात , पंथ, काहीच नसतअसतो तो फक्त एक भाव आणि एक जाण मौनांची धरणं तोडून सुटलेल्या प्रवाहाची प्रणय गीताची गंगा भेदभाव करत नाही !!

Design a site like this with WordPress.com
Get started