Featured

कोरडा पाऊस

नेहमीच वेळ साधून येतात असे नाही
नेहमीच कोसळतात असेही नाही
सगळेच पावसाळे भिजवून जात नाही
काही घेऊन जातात कवेत आणि
आपल्याच अंगणातल पाणी
नेहमीच तळे साठवत नाही
एक एक सर जाते निघून
दूर कुठेतरी रानाला भिजवून
रानातले तुषार घरात देत नाही
जातांना उरतात कोरडी उन्हें
वादळ देऊन अनावधानाने
पापण्यांचा कडा मात्र कोरड्या सोडत नाही!!

Featured

दागिना

कवितेचं पान ह्या you tube च्या वेब सिरिज माध्यमातून एक खूप सुंदर कविता आणि एक आगळे वेगळे कवि अनुभवायला मिळाले . त्यांनी लिहिलेलं ” माझं इवल हस्ताक्षर ” ह्यामधील एकूण एक कविता ही नुसती वाचायला नाही तर अनुभवायला पण उत्तम आहे. शब्द अपुरे पडतील पण भाव ओसंडून वाहत राहतील अश्या त्यांच्या कविता आहेत. त्या ऐकून मी लगेच त्या कुठे google वर सापडतात का हे बघत होते पण नाही, इतक्या सहजा सहजी ते शक्य नाही. पण ही कविता मी स्वतः लिहून काढली आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचावी हीच इच्छा . ह्यावतीरिक्त  “गंगेवरची म्हातारी ” आणि नात्यांवरच्या  विविध कविता आणि शेवटी आभार प्रदर्शनाची कविता , ह्या सर्वच उत्तमोत्तम आहेत. पण ही कविता मनात खोलवर गेली ! 

दागिना ( कवि : संजय चौधरी ) 

ती म्हणाली , “आई गं ! तू अंगठी का नाही घालत ? हिऱ्याची , छान छान खड्याची ? “
आई म्हणाली ; “तूच धर माझं बोट , लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभवती , हीच तर जगातली सर्वात मौल्यवान अंगठी . “
ती म्हणाली , “आई गं ! तू माळ का नाही घालत , सोन्याची पिवळी धम्म गळाभर ?’
आई म्हणाली,  “बछड्या ! तूच मार गळयात घट्ट मिठी . तुझ्या कोवळ्या हातानी आणि धडधडू दे तुझं इवल हृदय माझ्या वक्षावर , ह्यापेक्षा मौल्यवान नाहि बर दुसरा दागिना .” 
तिनं धरलं आईच बोट बाळ हातात ,मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला , ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्याभोर केसांवर .
आई म्हणाली “आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावे नि सजवावे , दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याच एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाहीं ! “

उम्मीद

चलो अब श्याम हो चुकी 

दीन की सारी परतें बुझी सी 

गहरे काले साये छू रहे है 

एक अंधेरा अब आनेको है 

मौन धरे या बात करे 

सांस ले या बंद करे 

आगे बढना है या थमना है 

क्या कहती हो जिंदगी एक सुबह और देखनी है ? 

निरोप

शून्याचा अर्थ शोधता शोधता शून्य होऊन बसतो ,भल्या मोठ्या गोंधळात शांत वादळ झेलतो 

लोप पावतील एके दिवशी सारे मनातील मनोरे ,चांदण्यांच्या झोळीसाठी सूर्य रोज झुरत नसतो 

कळत असतं अंधाराला त्याला सुद्धा डोळे आहेत झापड उघडुन मात्र तो उजेड कधीच बघत नसतो 

शोधत असता मोती शब्दांची माळ पेरण्याकरता ,कविता अवतरते तोवर काळ  निसटून जातो 

दृष्टीलाही दिसत नाही स्पर्शालाही मिळत नाही अस्तित्व अश्या कुणाचे मन उगाच का संभाळतो? 

जावे त्याला जाऊ द्यावे , धरणं तोडून द्यावे सारे ,वहावत जाण्याचा अर्थ ज्याचा त्याचा वेगळा असतो !!

Just before the dusk….

And once when I was done for the day 

And didn’t have hope for the  further way 

I sat cross legged looking at the sky 

With the hope and aspiration to fly 

But just like my crossed legs and my tired back

My inspiration kept changing its track 

And it’s just then I looked at the sunset hues

Which gave me so many clues 

“I am definitely off and down today ; but Still carrying a hope to shine brighter every next day” 

वाळवी

घराच्या कोपऱ्यात ठेवलेली एक शोभिवंत बाहुली एके दिवशी अचानक जमिनीवर कोसळली लाकडाची ती छिन्न विच्छिन्न झाली !! 

जोवर होती नवी तोवर सगळ्यांनाच हवी पण बरेच दिवसात फुटली नव्हती पालवी कळलच नाही आत वाढत होती  वाळवी!!

जन्म

ती बघ एक लाट आताच येऊन परत गेली ,पायाखालची वाळू गच्च ओली करून गेली जोवर ती कोरडी होते तोवर थोडा वेळ थांब 

नाव दिसतेय बघ दुरून येणारी ,कदाचित तीच असेल मला घेऊन जाणारी ,ती जवळ येईस्तोवर तरी थांब 

शिंपले बघ किती जमले हातात ,दिसेल खरा मोती एखाद्या शिंपल्यात ,एक तरी मोती हातात येईस्तोवर थांब 

गोष्टी – गाणी झाल्या , खाऊन – लेऊन झालं,सकाळची दुपार अन मग सांज झाली ,रात्रीचा शहारा अंगावर घ्यायला तरी थांब 

चालता चालता किती पुढे आलो बघ समोर दिसतात फक्त काळे ढग ,कोसळून वाहतील आता थोड्याच वेळात ,हुरहूर लावतील शुष्क उरात त्याचा ओलावा अनुभवायला,हरवलेली वाट पुन्हा सापडायला ,सहवासाचा शेवटचा आनंद द्यायला …..

थोडा वेळ तरी थांब !!! 

स्वप्न

हळूच रोज येत अलगद खुणावत 

फिरतय सतत हात ठेवून पोटाशी 

करमत नसेल कदाचित एकटेपणात 

जमलच नसेल उन वारा पावसाशी 

हवं असेल काहीतरी वेगळच जठरात 

रोज येऊन बसतय एकाच कोपऱ्याशी 

कधी खुणावत गोंधळात वेड्यागत 

कधी बडबडत एकांतात स्वतःशी 

कसं सांगावं नको थांबू उंबरठ्यात 

मीही उभी आहे झोळी घेऊन दाराशी

सगळच निसटतय कोरड्या वाळुगत 

हाती फक्त राहतय एक स्वप्नं उपाशी !!

शांत घरात…

शांत घरात दारं खिडक्या पण शांत होतात
कुणी कुणाशी संवाद साधत नाही
मनातल्या मनात कुजबुजत असतात

शांत घरात भांड्याचा पण आवाज नसतो
त्याला हलवणार कोण आणि ठेवणार कोण
एका वाटीचा दुसरीशी काही संबंध नसतो

शांत घरात असते एक इच्छा आणि आशा
दारं वाजतील, भांडी पडतील, भिंती हलतील
पण दिवस मावळून त्याला येते ति फक्त निराशा

शांत घरात रहातो एक एकटा कोपरा
स्वतःशी फार फार हिरमुसलेला
गोळा करत असतो किती तरी कचरा!

शांत घरात असते एक अशांत मन
आड्याशी बोलून बोलून थकलेल
सांभाळत असत उंबरठ्याच मोठेपण!!

उरले काही?

दारात उभारल्यावर जाणवल उंबराठा आता मोठा झाला आहे!
नजर वर करून बघताना जाणवलं दृष्टी आता धूसर झाली आहे!
आरशात न्याहळताना जाणवल काळीज खूपच शांत झालय!!
घराच्या भिंतीकडे नजर वळवल्यावर जाणवलं ऐकणारे कान आता दुरावाले आहे!!
कागदावर लिहिताना जाणवल, शब्द आता कोरडे झाले आहेत!!
आयुष्यात दिसणाऱ्या प्रश्नाकडे बघताना जाणवल, उत्तर आता संपली आहे!!

तुम्हारे बारे में ( मानव कौल ) 2

आओ छुप जाते हैं-ख़ुश रहने के बहानों से, कोरे इंतज़ार से, वक़्त के रुकने और तेज़ भागने से, नींद से लंबी रातों से, ढेर सारे सपनों से, अपनी क्षणिक सफलताओं से, हमेशा ठीक दिखने की थकान से, अपेक्षाओं से, भागते रहने से, कमज़ोर क्षणों से, आईनों से, हार से, ईश्वर से, अच्छी बातों से, देश-प्रेम से, अपने हिंदू और मुसलमान होने से, तेरे-मेरे से, जीवन भर के प्रेम से और पहले प्यार से, तुम्हें पा लेने और छूट जाने से, रोने-रुलाने और फिर मान जाने से -चलो न छुप जाते हैं इस छुपने से और एक दिन मिल जाने से ।

कवाड

थांबतो नभात माझ्या ,चंद्र आसुसलेला
अगणित नक्षत्रातुंनी तो वेगळाच भासला!!

सुर लागतो वेगळा अन गीत होते आगळे
का असे होते अचानक त्या कळे ना मज कळे!!

डाव होते ओळखीचे, पण अर्थ नाही लागला
देह होते मानवी पण व्यर्थ जन्म जाहला!!

होई हा काळोख का रे भेटवाया बघ तुला?
टाकुनी ओझे किती ते सूर्य का रे संपला?

पालवी येई उदयाला ?आज नाही ज्ञात काही
वाळलेले फुल जैसे गंध नाही त्यात काही!!

लांबूनी दिसते कवाड आणि एक पायावाट
हाची पुढला मार्ग आहे सांगते ऐसे ललाट!!

हे सुखाचे द्वार आहे का मनाची कल्पना
घेऊ दे सुखवून थोडे अन सरूदे वेदना!!

Design a site like this with WordPress.com
Get started